अपेक्षा जोड....

By Admin | Updated: October 29, 2014 22:08 IST2014-10-29T22:08:14+5:302014-10-29T22:08:14+5:30

अपेक्षा जोड....

Expectations ... | अपेक्षा जोड....

अपेक्षा जोड....

ेक्षा जोड....
..............
फोटो मेलवर आहेत....
............
आज राज्यातील अनेक खेड्यांमधील तरुण वर्ग हा शहरांकडे नोकरीसाठी येत आहे. नवीन सरकारने खेड्यांमंध्ये काही रोजगार उपलब्ध केल्यास या तरुणांना शहरात येऊन कष्ट करण्याची गरज भासणार नाही. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील एसआरए प्रकल्प हे अर्धवट स्थितीमध्ये पडून आहेत. नव्या सरकारने यावर नवीन कायदे काढून ते लवकरच पूर्ण करावेत.
प्रमोद देवडिगा (सामाजिक कार्यकर्ते)
........................................
राज्य अखंड ठेवा
गेल्या अनेक वर्षांपासून काही लोक महाराष्ट्राचे दोन भाग करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र हा महाराष्ट्र सदैव अखंड राहील हीच अपेक्षा या नवीन सरकारकडून आहे. शिवाय राज्यातील शेतकारी हे आत्महत्या करत आहेत. नव्या सरकारने त्यांना योग्य मदत करुन या आत्महत्या थांबवाव्यात. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. ते लवकरच पूर्ण करावेत.
सुभाष मराठे (अध्यक्ष, घरेलू कामागार महिला संघटना)
................................................

पहिल्यांदा राज्यातील टोलचा प्रश्न या सरकारने सोडवला पाहिजे. राज्यात कुठेही फिरा सर्व राज्य हे टोलमुक्त व्हायला पाहिजे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दलितांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. यासाठी नव्या सरकारने कडक कायदे बनवण्याची गरज आहे. आज राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. या राज्यातील अनेक उद्योग दुसर्‍या राज्यात जात आहेत. हे रोकणे सरकाराचे पहिले कर्तव्य आहे.
राजेंद्र नगराळे (सामाजिक कार्यकर्ते)
................................................

Web Title: Expectations ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.