कर्करोगग्रस्त मुलांवरील उपचारांसाठी चेरीश आर्ट-२०२१ मध्ये कलाकृतींचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:02+5:302021-02-05T04:32:02+5:30

मुंबई : चेरीश लाइफ फाउंडेशनच्या वतीने ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान कुलाबा कॉजवे येथील विव्हिंग रूममध्ये प्रदर्शनाचे आयोजन ...

Exhibition of works of art in Cherish Art-2021 for the treatment of children with cancer | कर्करोगग्रस्त मुलांवरील उपचारांसाठी चेरीश आर्ट-२०२१ मध्ये कलाकृतींचे प्रदर्शन

कर्करोगग्रस्त मुलांवरील उपचारांसाठी चेरीश आर्ट-२०२१ मध्ये कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई : चेरीश लाइफ फाउंडेशनच्या वतीने ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान कुलाबा कॉजवे येथील विव्हिंग रूममध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चेरीश आर्ट एक्झिबिशन-२०२१ मध्ये भारतातील नावाजलेले ७५ कलाकार एकत्र येऊन आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवणार आहेत. या प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असणार आहे. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या चित्रांची यावेळी विक्री होणार आहे. याद्वारे होणाऱ्या निधी संकलनाचा वापर गरजू कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी केला जाणार आहे.

मुलांना जर वेळेत योग्य उपचार दिले तर बरीच कर्करोगग्रस्त मुले बरी होऊ शकतात. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रप्रेमींना आवडीची चित्रे पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर कर्करोगग्रस्त मुलांना मदतदेखील होणार आहे. असे मत चेरीश लाइफ इंडिया फाउंडेशनचे संस्थापक ब्लांचे सलढाणा यांनी व्यक्त केले.

Web Title: Exhibition of works of art in Cherish Art-2021 for the treatment of children with cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.