प्रदर्शनातून मिळाला महिलांंच्या कलागुणांना वाव....ईस्टर्न
By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:23+5:302014-08-25T21:40:23+5:30

प्रदर्शनातून मिळाला महिलांंच्या कलागुणांना वाव....ईस्टर्न
>प्रदर्शनातून मिळाला महिलांंच्या कलागुणांना वावभांडूप:भांडूपमध्ये आयोजिलेल्या महिला बचत गट उत्पादन प्रदर्शनात महिलाच्या कलागुणांना वाव मिळत त्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली. खाद्यपदार्थांपासून ते दैनंदिन जीवनातील उपयोगी अशी नानाविध उत्पादने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.भांडूपमध्ये १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्टपर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ममीज बचत गट आणि स्व.दिना बामा पाटील प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. बचतगटा अंतर्गत महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. तसेच त्यातून होणार्या विक्रीतून महिलांना रोजगारही उपलब्ध होत होता. यावेळी पूर्व उपनगरातील शेकडो बचत गटांतील महिलांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. महिलांनी तयार केलेले विविध स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच महिलांंच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा आस्वादही नागरिकांनी घेतला. प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यादरम्यान महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमही पार पडले. कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे आयोजिका पल्लवी पाटील यांनी सांगितले.