Join us  

वैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:15 AM

महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता यावर प्रतिबंधासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्रशासकीय कार्यवाहीसाठी सर्व वरिष्ठ सनदी अधिका-यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात येत आहे.

- जमीर काझीमुंबई : कोरोनाच्या (कोविड - १९) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना (आयएएस) त्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीसाठीचा कालावधी ३ महिन्यांनी वाढवून देण्यात आला आहे. यापूर्वी तपासणी पूर्ण करण्यासाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र आता ४० वर्षांवरील अधिका-यांना वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी ३० जूनपर्यंत सवलत देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडून सांगण्यात आले.महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता यावर प्रतिबंधासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्रशासकीय कार्यवाहीसाठी सर्व वरिष्ठ सनदी अधिका-यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात येत आहे.सोबतच अधिकाºयांना विविध घटकांतील अधिकारी, कर्मचारी, संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधींशी भेटी घेऊन निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती तसेच प्रतिबंधाच्या कामामध्ये अधिकारी व्यस्त असल्याने ३१ मार्चपर्यंत स्वत:ची वैद्यकीय तपासणी करणे शक्य नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ४० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या प्रशासकीय सेवेतील अधिकाºयांना वैद्यकीय तपासणीसाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. या कालावधीपर्यंत त्यांनी तपासणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करायचा आहे.आयएएस अधिकाºयांना देण्यात आलेल्या मुदतवाढीप्रमाणचे राज्यातील आयपीएस अधिका-यांनाही तपासण्यांसाठी मुदतवाढ देण्यात येईल, त्याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल, असे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.राज्यात किती आहेत आयएएस, आयपीएस?महाराष्ट्रात  सध्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) ३१२ अधिकारी कार्यरत आहेत, तर भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) २४६ अधिकारी कार्यरत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :पोलिसमुंबई