नागरिक विकास पक्षाची कार्यकारिणी बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:06 IST2021-03-08T04:06:38+5:302021-03-08T04:06:38+5:30

मुंबई : नागरिक विकास पक्ष (सिटीझन डेव्हलपमेंट पार्टी) मुंबई यांची कार्यकारिणी बैठक वसईच्या सातिवली रोड येथे पार पडली. यावेळी ...

Executive meeting of Citizen Development Party held | नागरिक विकास पक्षाची कार्यकारिणी बैठक संपन्न

नागरिक विकास पक्षाची कार्यकारिणी बैठक संपन्न

मुंबई : नागरिक विकास पक्ष (सिटीझन डेव्हलपमेंट पार्टी) मुंबई यांची कार्यकारिणी बैठक वसईच्या सातिवली रोड येथे पार पडली. यावेळी पक्षाच्या राज्य, माहिती तंत्रज्ञान व प्रभागांच्या पदांवर विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाच्या राज्य आदिवासी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश हरी कुनरा, राजकीय सल्लागारपदी पालघरचे वीरेंद्र सिंग, महाराष्ट्रच्या आयटी चीफपदी अजय दुबे, मीडिया प्रभारीपदी आर. एन. सिंग, प्रभाग क्रमांक ६४च्या अध्यक्षपदी देवीदास नाना गाडेकर आणि मुंबई सचिवपदी संजय सिंग या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी नगर विकास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सिंह यांच्यावतीने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमात पक्षाचे सल्लागार डॉ. सी.आर. सरोज, अध्यक्ष अनिता झा, प्रभाग क्रमांक ७५च्या सचिव मीरा राठौर, रोशन झा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सिंह, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. बृजेश पांडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष देवेंद्र सिंग सैनी, मुंबईचे उपाध्यक्ष चंदन सिंह, सरचिटणीस लाल शेखर सिंह आणि राष्ट्रीय प्रवक्त्या कालिका सिंह हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Executive meeting of Citizen Development Party held