शरीरविक्रय करणाऱ्या चौघींची सुटका
By Admin | Updated: March 7, 2015 01:28 IST2015-03-07T01:28:06+5:302015-03-07T01:28:06+5:30
बांगलादेशातून अपहरण करून आणलेल्या महिलेसह शरीरविक्रय करणाऱ्या चार महिलांची शीळ-डायघर येथून सुटका करण्यात आली.

शरीरविक्रय करणाऱ्या चौघींची सुटका
ठाणे : बांगलादेशातून अपहरण करून आणलेल्या महिलेसह शरीरविक्रय करणाऱ्या चार महिलांची शीळ-डायघर येथून सुटका करण्यात आली. बांगलादेशातील एका महिलेला गुंगीचे औषध देऊन भारतात आणून विकले होते. तिला शरीरविक्रयास भाग पाडण्यात आले. याची माहिती तिने फोनद्वारे वडिलांना दिली. नंतर एका सामाजिक संस्थेकडून ही माहिती मिळताच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने बुधवारी ही कारवाई केली.
आपली मुलगी मुंबईतील एका भागात असल्याची माहिती तिच्या वडिलांनी बांगलादेशातील ‘राईट जेस्वर’ या संस्थेला दिली होती. या संस्थेने तातडीने ही माहिती सांताक्रुझच्या ‘जस्टीस अॅन्ड केअर’ या संस्थेचे मनोज गुराणी यांना दिली. त्यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना तपासाचे आदेश दिले. त्यांच्या पथकाने माहितीच्या आधारे कोपरी, लोकमान्यनगर, उपवन भागातील लोकेशन मिळविले. त्यानंतर शीळ डायघरमधील ‘अमन हाईटस’ या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील ४०६ क्रमांकाच्या खोलीत पोलिसांनी बुधवारी रात्री ११च्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी या महिलेसह आणखी तीन महिलांना खोलीत डांबून ठेवल्याचे आढळले. त्यांच्या आर्थिक हालाखीचा फायदा घेऊन त्यांना ग्राहकांशी शरिरविक्रयास भाग पाडल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी पाळत ठेवून याठिकाणाहून प्रदुमन गोकूळ शाहू (२९ रा. दहीसर) आणि राजेशकुनमार यादव (१९) या दोघांना ५ मार्च रोजी सकाळी ७च्या सुमारास अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
च्बांगलादेशमधून अपहरण करून शरीरविक्रय गरण्यास भाग पाडले
च्मोबाईल टॉवर आणि इतर माहितीच्या आधारे घेतला शोध.
च्कोलकात्यामधील तीन मुलींसह चार जणींना ठेवले होते डांबून
च्आर्थिक हालाखीचा घेतला फायदा