Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हातभट्टी केंद्रावर उत्पादन शुल्काचे छापे २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:37 IST

ठाणे व डोंबिवली विभागातील निरिक्षकांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. 

श्रीकांत जाधव 

मुंबई  - उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रावर छापे टाकले. या कारवाईमध्ये १२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये एकूण २१ लाख ८८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, ठाणे व डोंबिवली विभागातील निरिक्षकांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. 

या कारवाईत अंजूरगाव खाडी, कालवारगाव, छोटी देसाई मोठी देसाई खाडी, अलिमघर, दिवा खाडी, माणेरेगाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रावर छापे टाकण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये ५५ हजार २०० लिटर रसायन, ३५ लिटर गावठी दारू, दोन डिझेल इंजिन व इतर हातभट्टी साहित्यासह दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहेत.