- सीमा महांगडे मुंबई - शहर आणि उपनगरात सध्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरणाला वेग आला आहे. मात्र, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ३० एप्रिलनंतर कोणतेही खोदकाम करू नये तसेच १५ मेपूर्वी चालू असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापालिकेच्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि २ अंतर्गत १,२०४ रस्त्यांचे ३२७.६९ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे; तर, ५३२ रस्त्यांचे काम अंशत: पूर्ण झाले असून, १६९.१४ किलोमीटर काँक्रिटीकरण झाले आहे. एकूणच आतापर्यंत एकूण ७३.३९ टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे.
मुंबई खड्डेमुक्त करतानाच वाहतूक अधिक सुरळीत, गतिमान, सुरक्षित होण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. काँक्रीट रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे निर्माण होण्याचे प्रमाण अत्यल्प राहते. त्यामुळे देखभाल व डागडुजीवरील खर्चही कमी होणार आहे. मात्र, एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे ती पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
‘आयआयटी’कडून थर्ड पार्टी ऑडिटरस्ते काँक्रिटीकरणाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण केली जात आहे. मात्र, त्याची तपासणी करण्यासाठी पालिकेने कराराद्वारे आयआयटी मुंबईची त्रयस्थ संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.काँक्रीट मिश्रण बनविण्यापासून ते रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंतच्या टप्प्यातील क्यूब टेस्ट, कोअर टेस्ट, ड्युरॅबिलिटी टेस्ट, फिल्ड डेन्सिटी टेस्ट, आदी चाचण्या ‘आयआयटी’ने केल्या आहेत.
काँक्रिटीकरणानंतर चर खोदण्यास मनाईरस्ताकामे पूर्ण करताना पालिकेचा जल अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प, आदी विविध विभाग आणि विद्युत, गॅस वितरण, दूरध्वनी आदी संबंधित कंपन्यांशी समन्वय ठेवण्यात येत आहे. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही संस्थेस खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Web Summary : Mumbai's municipal commissioner bans digging after April 30 to avoid monsoon disruptions. Road works must finish before May 15. 73% of road concretization is complete. IIT conducts third-party audits. Digging is prohibited on concretized roads.
Web Summary : मुंबई नगर आयुक्त ने मानसून में बाधा से बचने के लिए 30 अप्रैल के बाद खुदाई पर प्रतिबंध लगाया। सड़क का काम 15 मई से पहले पूरा हो जाना चाहिए। 73% सड़क का कंक्रीटीकरण पूरा हो गया है। आईआईटी थर्ड-पार्टी ऑडिट करता है। कंक्रीट वाली सड़कों पर खुदाई प्रतिबंधित है।