विद्यापीठाच्या परीक्षांवर भरारी पथकांची नजर, माहिती तंत्रज्ञान प्रणालीची करणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:09 IST2017-11-26T02:09:35+5:302017-11-26T02:09:54+5:30
मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवण्यात येतात. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यापीठाने कंबर कसली असतानाही बीएमएसचा पेपर फुटला. त्यानंतर विद्यापीठाने दोन भरारी पथकांची नेमणूक केली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांवर भरारी पथकांची नजर, माहिती तंत्रज्ञान प्रणालीची करणार तपासणी
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवण्यात येतात. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यापीठाने कंबर कसली असतानाही बीएमएसचा पेपर फुटला. त्यानंतर विद्यापीठाने दोन भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षा केंद्रांवर ही पथके भेटी देऊन तिथल्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा वापर आणि मूलभूत सुविधांची तपासणी करणार आहे.
- विद्यापीठाने या परीक्षांचे मूल्यांकनही आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी विद्यापीठ सज्ज झाले आहे. आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर तपासणी समिती असे या प्रकरणी तयार केलेल्या पथकांना नाव दिले आहे. अंधेरी येथील महाविद्यालयातून पेपर फुटला होता. हे प्रकरण गांभीर्याने घेत विद्यापीठाने एक सदस्यीय समितीची नेमणूक केली होती. या समितीने विद्यापीठाला सोमवारी अहवाल सादर केला.
- या समितीने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणारी कॉपी रोखण्यासाठी नवीन पथकाची स्थापना करण्याची शिफारस केली होती. विद्यापीठाने तत्काळ २ पथके तयार केली आहेत.