प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे : सुभाष अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:23+5:302021-02-05T04:34:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जोपर्यंत संस्कृती आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर ...

Everyone should read a lot, putting aside their own shortcomings: Subhash Avachat | प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे : सुभाष अवचट

प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे : सुभाष अवचट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जोपर्यंत संस्कृती आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे. दर्जेदार नाटक व चित्रपट पहावेत. आपली भाषा जपविणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे ज्येष्ठ चित्रकार व साहित्यिक सुभाष अवचट म्हणाले.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप नुकताच पार पडला. यावेळी सुभाष अवचट बोलत होते. ते म्हणाले की, मराठीतील कला, संस्कृती आणि साहित्य अतुलनीय आहे. कोणालाही आज किंवा भविष्यात तिच्या अस्तित्वाची चिंता करण्याची गरज नाही. इंग्रजी भाषेची भीती ही जगात सर्वत्र आहे. कारण ही व्यापारी भाषा आहे. मात्र तिचे कौतुक इतर भाषांप्रमाणे नाही.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मराठी व अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांनी नोंदविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत विजेत्यांचे अभिनंदन केले.

----------------------

पुरस्कार विजेते -

निबंध लेखन - १) सूरदास भोसले २) मयूर कदम ३) ज्योती नायर

अभिवाचन - १) मयूर कदम २) ज्योति नायर ३) नीती तामसे

घोषवाक्य - १) नभा शिरोडकर २) ज्योती नायर ३) सागर लिपणे ४) उमेश पेठे

कविता लेखन - १) नभा शिरोडकर २) ज्योती नायर ३) कुशल नेहेते ४) रूपेश वानखेडे

प्रश्न मंजूषा - १) प्रशांत शिंदे २) रूपेश वानखेडे ३) भारत कांबळे ४) महेश कुमार डांगे

Web Title: Everyone should read a lot, putting aside their own shortcomings: Subhash Avachat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.