प्रत्येकालाच विजयाचे वेध
By Admin | Updated: October 17, 2014 00:52 IST2014-10-17T00:52:22+5:302014-10-17T00:52:22+5:30
विधानसभेच्या ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात या वेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. यातच या दोन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढती होणार आहेत.

प्रत्येकालाच विजयाचे वेध
नवी मुंबई : विधानसभेच्या ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात या वेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. यातच या दोन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतविभागणीमुळे थोडय़ाफार फरकाने आपलाच विजय होईल, असा विश्वास दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख उमेदवारांना वाटत आहे.
ऐरोलीतून राष्ट्रवादीचे संदीप नाईक, शिवसेनेचे विजय चौगुले, भाजपाचे वैभव नाईक व काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे तर बेलापूरमधून राष्ट्रवादीचे गणोश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा, भाजपाच्या मंदा म्हात्रे, काँग्रेसचे नामदेव भगत यांच्यात चुरस असणार आहे. दोन्ही मतदारसंघात मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र हे उमेदवार मतदारांवर आपला प्रभाव पाडण्यात फारसे यशस्वी झाले नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत बहुतेक वेळा दुहेरी लढती झाल्या होत्या. मात्र यावेळी प्रथमच दोन्ही मतदारसंघात चौरंगी लढती होत आहेत. त्यामुळे मतांचे मोठय़ा प्रमाणात विभाजन होणार आहे. या मतविभागणीचा फायदा आपल्यालाच होईल, असा विश्वास प्रत्येक उमेदवाराला वाटत आहे.
ऐरोली मतदारसंघात 4 लाख 8 हजार 43 मतदार आहेत. त्यापैकी 52 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर बेलापूर मतदारसंघात 3 लाख 90 हजार मतदारांपैकी केवळ 49 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. दोन्ही मतदारसंघात सरासरी 5क् टक्के मतदान झाले आहे. यावरून विजयी होण्यासाठी किमान 70 हजार मतांचा आकडा गाठणो गरजेचे आहे. असे असले तरी या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार साधारण पाच ते आठ हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विजय आपलाच होणार असा दावा प्रमुख उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र या चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 19 ऑक्टोबर रोजी होणा:या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
विजयी होण्यासाठी किमान 70 हजार मतांचा आकडा गाठणो गरजेचे आहे.
दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार साधारण पाच ते आठ हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. तरीही प्रत्येकालाच विजयाची खात्री वाटत आहे.