प्रत्येक धर्म हा राष्ट्रधर्मच - पंतप्रधान
By Admin | Updated: January 11, 2016 02:25 IST2016-01-11T02:25:25+5:302016-01-11T02:25:25+5:30
आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांचे ३०० वे ‘मारुं भारत, सारुं भारत’ हा अत्यंत महान ग्रंथ आहे. या पुस्तकात अनेक घटकांचा अंतर्भाव आहे.

प्रत्येक धर्म हा राष्ट्रधर्मच - पंतप्रधान
मुंबई: आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांचे ३०० वे ‘मारुं भारत, सारुं भारत’ हा अत्यंत महान ग्रंथ आहे. या पुस्तकात अनेक घटकांचा अंतर्भाव आहे. हे पुस्तक समाजमन जोडण्याचे काम करत असून, आचार्य यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक धर्म हा राष्ट्रधर्म आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
सायन येथील सोमय्या मैदानावर ‘साहित्य सत्कार सोहळा यात्रा ३००’ या कार्यक्रमातंर्गत आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांच्या ३०० व्या ‘मारुं भारत, सारुं भारत’ या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. (प्रतिनिधी)