अखेर शाळेच्या विश्वस्ताला बेड्या, अंधेरीतील विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:39 IST2017-11-08T05:38:56+5:302017-11-08T05:39:04+5:30

अंधेरीतील इंटरनॅशनल शाळेच्या परदेशी नागरिक असलेल्या विश्वस्ताला अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाळेतील ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे

Eventually, the rape case of the schoolgirl, the rape case of Andheri girl | अखेर शाळेच्या विश्वस्ताला बेड्या, अंधेरीतील विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरण

अखेर शाळेच्या विश्वस्ताला बेड्या, अंधेरीतील विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरण

मुंबई : अंधेरीतील इंटरनॅशनल शाळेच्या परदेशी नागरिक असलेल्या विश्वस्ताला अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाळेतील ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ब्रिलंट पॅट्रिक जॅकी हेन्री मॉरीस (५७) असे विश्वस्ताचे नाव असून, तो फ्रान्सचा नागरिक आहे. न्यायालयाने त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरी परिसरात ४ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. मॉरीसच्या शाळेत ती शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी १८ मे रोजी मॉरीसविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात मॉरीसने मुलीसोबत अश्लील चाळे केले. नेहाच्या अंगावर आढळून आलेल्या खुणांमुळे पालकांनी नेहाकडे चौकशी केली. तेव्हा नेहाने मॉरीसने तिच्यासोबत केलेल्या अश्लील कृत्याला वाचा फोडल्याची माहिती समोर आल्याचे पालकांनी सांगितले.
सामाजिक संस्थेमार्फत नेहाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कायदेशीर बाबी समजून त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार नोंदविली. एमआयडीसी पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून मॉरीसचा शोध सुरू केला. मात्र तो फ्रान्सला निघून गेल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण जात होते. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला १४ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास न्यायालयाच्या आदेशाने मेघवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस आयुक्तांवर सोपविण्यात आला आहे.

Web Title: Eventually, the rape case of the schoolgirl, the rape case of Andheri girl

टॅग्स :Arrestअटक