Join us  

मुंबईकरांसाठी संध्याकाळची वेळ रस्ते अपघाताची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 5:59 AM

२०१८ ची आकडेवारी; सायंकाळी ६ ते ९ दरम्यान सर्वाधिक ३८६ अपघात

मुंबई : मुंबईत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतूक मंदावते. पण याच वेळेत सर्वांत जास्त ३८६ रस्ते अपघात घडले असून रात्री ९ ते १२ दरम्यान सर्वाधिक ७१ मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या२०१८ च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

आकडेवारीनुसार, मुंबईतील महामार्गांवर २०१८ मध्ये २,३५० अपघात झाले. त्यामध्ये ४७५ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ६ ते ९ या वेळेत ३८६ अपघात झाले असून यात ६३ जणांना नाहक जीवाला मुकावे लागले आहे. तर रात्री ९ ते १२ या वेळेत ३४० अपघात घडले असून, त्यामध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

याच कालावधीत सकाळी ६ ते ९ दरम्यान १९९ रस्ते अपघात झाले असून ५४ जणांनी जीव गमावला. तर सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान २९६ अपघातांत ६१ जणांचा मृत्यू झाला. दुपारी वाहतूक कमी असते; पण त्या वेळेतही मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.दुपारी १२ ते ३ या वेळेत ३१२ रस्ते अपघात होऊन ६४ जण ठार झाले. तर दुपारी ३ ते संध्याकाळी ६ दरम्यान ३५८ अपघात होऊन ५४ जणांना मृत्यू झाला. रात्री १२ ते ३ या वेळेत २८१ अपघातांत ६४ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत १७८ अपघातांत ४४ जणांचा मृत्यू झाला.

रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत सर्वांत जास्त ७१ मृत्यू२०१८ मध्ये रात्री ९ ते १२ दरम्यान सर्वाधिक ७१ मृत्यू मुंबईतील रस्त्यांवर झाले. या कालावधीत घडलेल्या एकूण २,३५० अपघातांमध्ये ४७५ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११२ पुरुषा तर २५ स्त्रिया होत्या. यात १९ ते २५ वयोगटांतील सर्वाधिक १३७ तरुण, तरुणी होते. तर, १८ वर्षांखालील वयोगटात कमी अपघात घडले आहेत.

टॅग्स :अपघात