Join us

आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 07:33 IST

बेस्टकडून रविवारी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुंबई : सीएसएमटी येथील कामासाठी मध्य रेल्वे मार्गावरील ब्लॉक रविवारी दुपारी १२:३० तर, ठाणे येथील कामासाठी दुपारी ३:३० पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या दिवशीही प्रवाशांना लोकल प्रवासात अडचणींचा डोंगर पार करावा लागणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

बेस्टकडून रविवारी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव हे सातत्याने ब्लॉक कालावधीतील फलाटांच्या कामाची पाहणी करत आहेत. काम व्यवस्थित होते आहे की नाही, कामाचे नियोजन कसे होते आहे, हे पाहतानाच काम वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. भविष्यात या कामाचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :मुंबई लोकल