नऊ वर्षानंतरही दासगांव दरडग्रस्तांचा आक्रोश कायम
By Admin | Updated: July 24, 2014 23:43 IST2014-07-24T23:43:48+5:302014-07-24T23:43:48+5:30
26 जुलैच्या काळरात्री निसर्गाचा कोप झाला आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालं. काळजाचा थरकाप उडवून देणा:या या दुर्घटनेला आज तब्बल नऊ वष्रे लोटली,

नऊ वर्षानंतरही दासगांव दरडग्रस्तांचा आक्रोश कायम
संदीप जाधव - महाड
26 जुलैच्या काळरात्री निसर्गाचा कोप झाला आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालं. काळजाचा थरकाप उडवून देणा:या या दुर्घटनेला आज तब्बल नऊ वष्रे लोटली, मात्र दासगांव येथील 94 दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात शासनयंत्रणोला अपयश आल्याचे दिसून येत आहे.
या दुर्घटनेत घरातील करतीसवरती माणसंच गमावलेले हे दरडग्रस्त गेली 9 वष्रे पत्र्याच्या तात्पुरत्या निवारा शेडमध्येच खितपत पडून आहेत. असं गुरंढोरासारखं जगणं हवंच कशाला, असे हताशपणो म्हणण्याची पाळी या दरडग्रस्तांवर आज आलेली आहे. पुनर्वसनासाठी शासनाने आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या दरडग्रस्तांना भूखंड दिले खरे पण निधी अभावी त्या भूखंडावर घरे बांधायची तरी कशी या विवंचनेत हे दरडग्रस्त सध्या आहेत.
2क्क्5 च्या अतिवृष्टीत मुंबई - गोवा महामार्गालगतच्या दासगांव येथे डोंगराच्या दरडी घरावर कोसळून 42 जण गाडले गेले होते तर शंभरहून अधिक कुटुंबांच्या संसाराची अक्षरश: वाताहत झाली होती. या बेघर झालेल्या दरडग्रस्त कुटुंबांचे गावाजवळच पत्र्याच्या तात्पुरत्या निवारा शेड बांधून त्या ठिकाणी शासनाने त्यांचे पुनर्वसन केले होते. त्यांना पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन त्यावेळी शासनाने दिलेले होते. मात्र या आश्वासनाची घोषणा हवेतच विरली. ही दुर्घटना ज्या दिवशी घडली त्याच रात्री महाड तालुक्यातील जुई कोंडीवते, रोहन या गावावर देखील दरडी कोसळून अनेकांचे बळी गेले होते. ही सर्व कुटुंबे बेघर झालेली होती. मात्र या तीनही ठिकाणच्या दरडग्रस्तांना सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून त्या त्या गावातच पक्की घरे बांधून पुनर्वसन एका वर्षातच केले होते. मात्र 9 वर्षानंतरही अनेकवेळा आंदोलने, रस्ता रोको केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी दासगाव येथील 94 कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी शासनाने भूखंडाचा ताबा दिला. तसेच घरे बांधण्यासाठी प्रत्येकी 95 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे मान्य केले होते. यापैकी दोन महिन्यापूर्वी 2क् हजार रुपयांचा पहिला टप्पा या दरडग्रस्तांना देण्यात आला आहे. उर्वरित रक्कम कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्यात देण्यात येणार आहे.
आज या ठिकाणी सुमारे सहा ते सात जणांनी घरांच्या जोत्याचे काम पूर्ण केले असून पुढील निधीच्या मागणीसाठी हे लाभार्थी सध्या प्रांताधिकारी - तहसील कार्यालयात दररोज खेटा मारत आहेत. निधी आल्यानंतर तुम्हाला मिळेल अशी उत्तरे त्यांना देण्यात येत असल्याचे या दरडग्रस्तांनी सांगितले. 94 कुटुंबांनाच हे भूखंड देण्यात आलेले असून अन्य 8 कुटुंबांना भूखंड दिलेले नाहीत.
तात्पुरत्या निवारा शेडची अवस्था अत्यंत दयनिय असून शेडमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. ऊन, पाऊस, थंडी, वादळी वा:याशी झुंज देत कशीबशी 9 वष्रे काढली पण लोकप्रतिनिधीकडून आमची पूर्णपणो निराशा झाली असल्याचे अनुo्री उकीडे यांनी सांगितले. या दुर्घटनेत दोन तरुण मुलं गमावलेल्या भागोजी भिडे यांनी तर आपलं आयुष्य याच पत्र्याच्या शेडमध्ये जाणार असे सांगितले. आम्हाला घरे बांधून देण्यासाठी शासनाकडे पैसा नसेल तर सामाजिक संस्थांनी तरी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संगीता खैरे यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा - प्रांताधिकारी सातपुते
दासगांव येथील दरडग्रस्तांना घरे बांधण्यासाठी 95 हजार रुपयेचे अनुदान टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. मात्र या निधीमध्ये घरे बांधून पूर्ण होत नसल्याचे दरडग्रस्तांचे म्हणणो आहे. मात्र ही घरे बांधून देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी केले.