मुंबई : राज्यभर विखुरलेल्या वडार समाजाला एकत्र करून त्यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने वडार समाज आर्थिक विकास समिती स्थापन केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. विभक्त भटक्या जमाती आणि मागासप्रवर्ग विभागातर्फे याबाबतचा अध्यादेश नुकताच जाहीर करण्यात आला आहे.तीन प्रादेशिक आणि सहाय्यक उपयुक्ताच्या मार्फत चौगुले हे वडार समाज आर्थिक विकास समितीचा कारभार चालवतील. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
वडार समाज आर्थिक विकास समिती स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 05:06 IST