कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी कृती दलाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:05 IST2021-05-19T04:05:42+5:302021-05-19T04:05:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व ...

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी कृती दलाची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व बालकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार या समितीच्या सदस्य सचिव असतील, तर मुंबई पालिका आणि पोलीस आयुक्त यांचे प्रतिनिधी, मुंबई बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव विक्रमसिंग भंडारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्राजक्ता देसाई हे या समितीचे सदस्य असतील. या समितीची पहिली बैठक साेमवारी घेण्यात आली. काेराेनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती संकलन तसेच पुढील कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबतच बैठकीत चर्चा करण्यात आली.
.........................................................