Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi: गणपती स्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 10:48 IST

ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली तरी चालेल.

मुंबई : भाद्रपद शुक्ल चतुर्थी २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७.५७ पर्यंत आहे. त्यामुळे याच दिवशी गणेश स्थापना करावयाची आहे. गणेश स्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५६ पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी, असे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली तरी चालेल. गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्या जागी अक्षता अर्पण कराव्या. गणेशपूजेसाठी पुरोहित नसतील तर पुस्तकावरून किंवा आॅनलाइन अ‍ॅप वापरून पूजा करावी. २५ आॅगस्ट रोजी दुपारी १.५८ नंतर गौरी आणावयाच्या आहेत. २६ आॅगस्ट रोजी गौरीपूजन आहे. २७ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३६ नंतर गौरी विसर्जन करायचे आहे. १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन उशिरा म्हणजे १० सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. 

टॅग्स :गणेशोत्सव