Join us

मध्य रेल्वे एसी लोकलचे सारथ्य महिलांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 06:54 IST

मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल जानेवारीअखेर धावणार असून, ती महिला चालविणार आहे. एसी लोकल चालविणारी देशातील पहिली महिला मध्य रेल्वे मार्गावरील ठरणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल जानेवारीअखेर धावणार असून, ती महिला चालविणार आहे. एसी लोकल चालविणारी देशातील पहिली महिला मध्य रेल्वे मार्गावरील ठरणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते सीएसएमटीवरून ३० जानेवारी रोजी पहिल्या एसी लोकलला व्हिडीओद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. या एसी लोकलची पहिली फेरी पनवेल ते ठाणे यादरम्यान होईल. ३१ जानेवारीपासून एसी लोकलच्या नियमित १६ फेºया ट्रान्स हार्बर मार्गावर धावतील. एसी लोकलचे तिकीट दर ठाणे ते वाशी १३० रुपये आणि ठाणे ते पनवेल १७५ रुपये असे असणार आहे. ठाणे ते वाशी, नेरूळ आणि पनवेल यादरम्यान १६ फेºया चालविण्यात येतील.

टॅग्स :एसी लोकलमुंबई उपनगरी रेल्वे