Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात नवजात बाळ ठेवून अज्ञात व्यक्तीचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:14 IST

पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला, मात्र कोणीच सापडले नाही. अखेर त्या बाळाला पोलिस मोबाईल व्हॅनमधून वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. 

मुंबई : सांताक्रूज पश्चिम येथील दौलतनगर परिसरात असलेल्या रिक्षामध्ये सोमवारी एक पुरुष जातीचे नवजात बाळ ठेवून अनोळखी व्यक्तीने पळ काढला. याची माहिती सांताक्रूज पोलिसांना रात्री मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या बाळाला पोलिसांनी रिक्षामधून ताब्यात घेतले.पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला, मात्र कोणीच सापडले नाही. अखेर त्या बाळाला पोलिस मोबाईल व्हॅनमधून वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सांताक्रूज पोलिस ठाण्याच्या शिपाई ज्योती दातीर (३३) यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल