इरले-घोंगडी झाले हद्दपार

By Admin | Updated: June 23, 2015 23:26 IST2015-06-23T23:26:26+5:302015-06-23T23:26:26+5:30

शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या इरले-घोंगडीच्या जागी रेनकोट तसेच प्लास्टिक टोप्यांनी अतिक्रमण केल्याने आदिवासींच्या इरले-घोंगडी बनविण्याच्या

Erle-blinds have been deported | इरले-घोंगडी झाले हद्दपार

इरले-घोंगडी झाले हद्दपार

वाडा : शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या इरले-घोंगडीच्या जागी रेनकोट तसेच प्लास्टिक टोप्यांनी अतिक्रमण केल्याने आदिवासींच्या इरले-घोंगडी बनविण्याच्या पारंपारीक व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात तातडीने रेनकोट उपलब्ध होत असल्याने तसेच इरले-घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळेनासे झाल्याने आदिवासी समाजातील कामगारांना इतर व्यवसायाचा शोध घ्यावा लागतो आहे.
भातशेतीचे काम करीत असताना पावसापासून बचाव करण्यासाठी आणि शरीराला उब आणण्यासाठी इरले-घोंगडी वापरले जात असे. पावसाळा सुरू झाला की आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे वाख (सुत) काढून इरले-घोंगडी बनविण्याचे काम करताना दिसत. आदिवासींना या व्यवसायातून घरबसल्या दोन पैसे मिळत. परंतु शेतातील बैल, नांगर हद्दपार होऊन त्यांची जागा आधुनिक ट्रॅक्टरने घेतली. तशाच प्रकारे इरले-घोंगडीचा जमाना सुद्धा बदलत्या काळानुसार संपुष्टात आला. पावसाळा सुरू झाला म्हणजे शेतकरी इरले-घोंगडीची आगाऊ आॅर्डर आदिवासींना देत असत. पण आज या इरले-घोंगडीचा विसर शेतकऱ्यांना पडला आहे. उपयोग तर दुरच परंतु पुढच्या पिढीला त्याची माहिती सुद्धा नाही. उलट कृत्रिम, रेनकोट, गमबूट, टोप्या अशा साहित्याची खरेदी करताना शेतकऱ्यांचीच गर्दी दिसून येते. (वार्ताहर)

Web Title: Erle-blinds have been deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.