वीज उपकेंद्राची संरक्षक भिंत पाडून इमारतीचे प्रवेशद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:16 IST2017-11-20T01:16:05+5:302017-11-20T01:16:07+5:30
मुंबई : कांदिवली येथील चारकोप सेक्टर आठमधील सिद्धी हाइट सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयांनी वीज उपकेंद्राची संरक्षक भिंत तोडून बळकावलेल्या जागेवर, इमारतीचे प्रवेशद्वार उभारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

वीज उपकेंद्राची संरक्षक भिंत पाडून इमारतीचे प्रवेशद्वार
मुंबई : कांदिवली येथील चारकोप सेक्टर आठमधील सिद्धी हाइट सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयांनी वीज उपकेंद्राची संरक्षक भिंत तोडून बळकावलेल्या जागेवर, इमारतीचे प्रवेशद्वार उभारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रिलायन्स एनर्जीने चारकोप पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे.
५ आॅगस्ट रोजी वीज कंपनीच्या अधिकाºयांनी या भागात पाहणी केली असता, त्यांना वीज उपकेंद्राची कंपाउंड वॉल तोडून तेथील जागा सोसायटीने बळकावल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी सोसायटीचे पदाधिकारी दीपचंद कदम आणि मुकेश काशिकर यांच्यासोबत संयुक्त पाहणी करीत सोसायटीला अतिक्रमण हटवून कंपाउंड भिंत पुन्हा मूळ स्थितीत बांधण्याबाबत पत्र दिले. मात्र, सोसायटी पदाधिकाºयांनी त्याची दखल घेतली नाही. १४ नोव्हेंबरला वीज कंपनीच्या अधिकाºयांनी पुन्हा त्या जागेला भेट दिली असता, त्या जागेवर सोसायटीने प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू केल्याचे निदर्शनास आले. सोसायटी पदाधिकाºयांच्या ही वर्तणूक उद्दामपणाची असून, अशा कृत्यांमुळे वीज उपकेंद्राला धोका निर्माण होऊन अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत चारकोप पोलीस आणि महापालिकेने याची गंभीर दखल घेत, संबंधितांवर एमआरटीपीअन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.