पुरेशी झोप हेच सौंदर्याचे रहस्य : अभिनेत्री तब्बू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:44 IST2017-11-02T01:43:24+5:302017-11-02T01:44:21+5:30

धकाधकीच्या दिनक्रमात वेळेवर आणि पुरेशी झोप, हेच खरे सौंदर्याचे रहस्य असल्याचे गुपित अभिनेत्री तब्बू हिने उलगडले. सौंदर्य म्हणजे चेह-यावर मेकअप करून घराबाहेर पडणे ही व्याख्याच चुकीची आहे.

Enough sleep is the beauty of beauty: actress Tabu | पुरेशी झोप हेच सौंदर्याचे रहस्य : अभिनेत्री तब्बू

पुरेशी झोप हेच सौंदर्याचे रहस्य : अभिनेत्री तब्बू

मुंबई : धकाधकीच्या दिनक्रमात वेळेवर आणि पुरेशी झोप, हेच खरे सौंदर्याचे रहस्य असल्याचे गुपित अभिनेत्री तब्बू हिने उलगडले. सौंदर्य म्हणजे चेह-यावर मेकअप करून घराबाहेर पडणे ही व्याख्याच चुकीची आहे. सौंदर्य हे केवळ चेह-यापुरते मर्यादित नसून, आपली त्वचा हासुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्वचा जपणे, ती टवटवीत व निरोगी असणे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असेही तिने सांगितले.
लोअर परळ येथे ‘व्हॅसलिन’ आयोजित एका कार्यक्रमात अभिनेत्री तब्बू हिने सौंदर्यविषयक टिप्स दिल्या. याप्रसंगी, तब्बूला व्हॅसलिनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले. या वेळी आईने सांगितलेली सौंदर्य जपण्याची व खुलण्याची महत्त्वाची टीप कोणती, असे विचारताच, तिने वेळेवर आणि पुरेशी झोप, हेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बºयाचदा पुरेशा झोपेवरच चांगला मूड, परफेक्ट काम आणि छान दिवस अवलंबून असतो, असेही तिने नमूद केले.
बदलत्या वातावरणामुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचत असते, त्यामुळे सध्या त्वचेला कायमच मॉइश्चरायझ ठेवण्याची अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरातून बाहेर पडताना मॉइश्चरायझर
लावले पाहिजे, जेणेकरून त्वचेचा ओलावा आणि मृदुपणा टिकण्यास मदत होते, शिवाय उन्हाच्या तीव्रतेपासून त्वचेचा बचाव होतो, असेही ती म्हणाली.

Web Title: Enough sleep is the beauty of beauty: actress Tabu

टॅग्स :Tabuतब्बू