Join us  

अभियंते लॉकडाऊनचा उपयोग करत आहेत नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 7:34 PM

भविष्यातील आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांची तयारी

मुंबई : देशव्यापी लॉकडाउनच्या काळात अभियांत्रिकी पदवीधर तसेच अनुभवी व्यावसायिकांसमोर नोकरी शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याकरिता स्वतःला तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकण्यावर त्यांचा अधिकतम भर असल्याचे  समोर आले आहे. या ऑनलाइन सर्वेक्षणाचा उद्देश लॉकडाउनच्या काळात अभियंत्यांना सामोरे जावे लागणा-या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणे तसेच या अडचणींवर ते कशाप्रकारे मात करत आहेत हे जाणून घेण्याचा होता.  ब्रिजलॅब्ज सोल्युशन्सने केलेल्या या सर्वेक्षणात  १५०० पेक्षा अधिक नवे अभियांत्रिकी पदवीधर आणि लॉकडाउमध्ये काम करणा-या व्यावसायिकांनी यात सहभाग नोंदवला.या सर्वेक्षणात सामील झालेल्या पुरुष आणि महिला अभियंत्यांनी सध्यस्थितीत आवश्यक आणि विद्यमान कौशल्यामध्ये फरक असून हे अंतर दूर करण्यासाठी आणि ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी लॉकडाउन कालावधीचा उपयोग केल्याची माहिती दिली. त्यामुळे एकूण सहभागींपैकी ८४.४८ टक्के अभियंते आणि तंत्रज्ञान पदवीधर त्यांना हव्या असलेल्या नोकरीशी निगडीत नवे तंत्रज्ञान शिकत असल्याचे समोर आले आहे. तर सर्वेक्षणात सामील ७१.९५% जणांनी ते सध्या नोकरीच्या शोधात असल्याचे सांगितले. लॉकडाउनदरम्यान नवीन अभियंत्यांना तसेच अनुभवी व्यावसायिकांनी नोकरी शोधण्याचे मोठे आव्हान असल्याचे कबूल केले. सध्याच्या घडीला आर्थिक मंदीचा त्यांना फटका बसला आहे. महामारीमुळे देशभरातील संस्थ्यांच्या कर्मचारी भरतीवर परिणाम झाल्यामुळे जे २४.९२% वर्किंग अभियंते नोकरी बदलण्याच्या मन:स्थितीत असून त्यांच्या स्वप्नांना खीळ बसली असल्याचे प्रतिसाद त्यांनी सर्वेक्षणात नोंदविले आहेत.या सर्वेक्षणातून काही महत्त्वाचे कलही समोर आले आहेत. १५.५३ टक्के अभियांत्रिकी पदवीधर त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांसह या क्षेत्राशी प्रासंगिक राहण्याचा संघर्ष करत आहेत. त्यामुळे या तून असा निष्कर्ष निघतो की, सतत विकसित होणारे तंत्रज्ञान क्षेत्र आणि गळाकापू स्पर्धेत या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी सतत आपल्या कौशल्यांना अद्ययावत करण्याची गरज असल्याचे ही समोर आले आहे. नोकरीच्या क्षेत्रात लॉकडाऊनचा असा परिणाम हा स्वाभाविक आहे. सध्या नवे अभियांत्रिकी पदवीधर आणि अनुभवी व्यावसायिक हे दोघेही या क्षेत्रातील नव्या कौशल्याच्या वाढत्या मागणीमुळे सारख्याच प्रमाणात आव्हानांना तोंड देत आहेत. सध्याची बाजाराची स्थिती आणि नजीकच्या भविष्यातील अपरिहार्य स्पर्धा लक्षात घेता, आपल्या शिकण्याचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करणे, हेच शहाणपणाचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया  ब्रिजलॅब्जचे संस्थापक नारायण महादेवन यांनी दिली.

 

टॅग्स :तंत्रज्ञानकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस