मुंबई : अकरावी आणि आयटीआय प्रवेशामध्ये कमालीची घट दिसत असताना अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मात्र गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश, तर १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहोचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. वाघ यांनी सांगितले. शिक्षकांना यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत, याची माहिती करून दिली. विद्यार्थ्यांना आभासी टूर घडविल्याचेही त्यांनी सांगितले.
बारावीनंतरचे अभियांत्रिकी पदविका प्रवेश 100% पूर्ण, तंत्रशिक्षण संचालनालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:07 IST