वाळीत प्रकरणावर अखेर पडदा
By Admin | Updated: April 1, 2015 22:18 IST2015-04-01T22:18:18+5:302015-04-01T22:18:18+5:30
मुरूड तालुक्यातील एकदरा गावातील बहुचर्चित असलेल्या वाळीत प्रकरणावर अखेरीस पडदा पडला आहे. श्रीरामनवमीचा उत्सव व स्रेहसंमेलनाचा

वाळीत प्रकरणावर अखेर पडदा
आगरदांडा : मुरूड तालुक्यातील एकदरा गावातील बहुचर्चित असलेल्या वाळीत प्रकरणावर अखेरीस पडदा पडला आहे. श्रीरामनवमीचा उत्सव व स्रेहसंमेलनाचा कार्यक्रम एकत्रित येऊन वाळीत जगन वाघरे, पाटील, दामशेठ कुटुंबीयांनी व एकदरा कोळी समाजाने साजरा केला.
रामनवमी उत्सव व पालखी सोहळा आणि दुसऱ्या दिवशीचा स्रेहसंमेलनाचा कार्यक्रम गेली कित्येक वर्षे एकदरा गाव वाळीत प्रकरणामुळे राज्यभर गाजत होता. या कार्यक्रमामुळे वाळीत प्रकरणावर पडदा पडल्याचे दिसून येत होते.
श्रीरामनवमीच्या उत्सवात मंदिरात भजन, कीर्तन व जन्मोत्सव व सायंकाळी एकदरा ते मुरूड, मुरूड ते एकदरा अशी भव्य पालखी काढण्यात येते. हा उत्सव पाहण्यासाठी तालुक्यातून व शहरातून प्रचंड भाविकांची गर्दी होते. यावेळी श्रीरामनवमी उत्सवात बहुचर्चित एकदरा वाळीत प्रकरणामुळे कुठे गालबोट लागतो की काय, अशी चर्चा सर्वत्र होत होती. परंतु असे काही न होता एकदरा वाळीत प्रकरणातील जगन वाघरे, गणेश दामशेठ, नारायण वाघरे व रश्मीकांत पाटील यांच्यासह त्यांचे सर्व वाळीत कुटुंबीय व कोळी समाज साजरा करत असलेल्या श्री रामनवमी उत्सवात व भव्य पालखी मिरवणुकीत एकत्रितपणे सहभागी झालेले दिसले. दुसऱ्या दिवशी या उत्सवाची सांगता पारंपरिक पद्धतीने स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमाने झाली. (वार्ताहर)