Join us  

जून संपला, मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 4:04 AM

पूर्व उपनगरात मात्र तुरळक पावसाची नोंद झाली. येथे आपत्कालीन घटना घडतच असून, गेल्या २४ तासांत २ ठिकाण घरे पडली. ८ ठिकाणी झाडे कोसळली. ८ ठिकाणी शॉर्टसर्किट घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई : मान्सूनने देश व्यापला; आणि दक्षिण भारतासह ईशान्य पूर्व भारत, उत्तर भारतात पुरेसा पाऊस झाला. मात्र देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. विशेषत: जून महिना संपत आला तरीदेखील मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची नोंद ही ११.७२ टक्केच झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर हा पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेत ही नोंद अनुक्रमे ११.९२ आणि १६.७९ टक्के एवढी होती.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पावसाळी परिस्थिती अहवालानुसार, गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत ३९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २८ जूनपर्यंत ३८३.८ मिमी पाऊस पडला आहे. पावसाची वार्षिक सरासरी २ हजार ६६८ मिमी असून, यावर्षी आतापर्यंत १४.३९ टक्के एवढया पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २८ जून पर्यंत ४२२.२ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली होती. टक्केवारीत हे प्रमाण १६.७९ टक्के एवढ होते. दरम्यान, सोमवारी पहाटे ३ ते ४ या एका तासादरम्यान फोर्ट येथे २८ मिमी, कुलाबा १६, अंधेरी ४७, वसोर्वा ३५, विलेपार्ले येथे ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरात मात्र तुरळक पावसाची नोंद झाली. येथे आपत्कालीन घटना घडतच असून, गेल्या २४ तासांत २ ठिकाण घरे पडली. ८ ठिकाणी झाडे कोसळली. ८ ठिकाणी शॉर्टसर्किट घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.गेल्या २४ तासांत मुंबई आणि आसपासच्या भागात पश्चिमेकडील उपनगराच्या दिशेने जास्त प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. २ जुलैपासून उत्तर कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मुंबई व आसपासच्या भागात जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागमुंबई शहर पाऊस सर्वसाधारण ४०२ मिमी प्रत्यक्ष ३८८ मिमी४ टक्के उणेमुंबई उपनगर पाऊस सर्वसाधारण ३६० मिमी प्रत्यक्ष ३०९.२ मिमी१४ टक्के उणे२४ तासांचा पाऊस मिमी शहर १५.३५पूर्व उपनगर ५.९४पश्चिम उपनगर २०.५५२८ जूनपर्यंत पाऊसशहर २७८.९७पूर्व उपनगर २९१.६४पश्चिम उपनगर ३०१.३१

टॅग्स :पाऊस