Join us  

अखेर ७२ तासांनंतर रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 4:20 AM

गेल्या ७२ तासांपासून बंद असलेली रेल्वे पोलिसांची १५१२ ही हेल्पलाइन अखेर मंगळवारी दुपारी पुन्हा कार्यान्वित झाली.

मुंबई : गेल्या ७२ तासांपासून बंद असलेली रेल्वे पोलिसांची १५१२ ही हेल्पलाइन अखेर मंगळवारी दुपारी पुन्हा कार्यान्वित झाली. लोकलमध्ये वस्तू विसरण्यापासून ते गैरप्रकार रोखण्यासाठी प्रवाशांना फायदेशीर ठरत असलेली ही हेल्पलाइनवायर चोरीला गेल्यामुळे बंद होती.महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांचे कनेक्शन रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइनला आहे. वाडीबंदर येथे असलेल्या रेल्वे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन क्रमांकाला जोडणारी वायर अज्ञात चोरट्यांनी लांबवली. यामुळे शनिवारपासून रेल्वे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षासह हेल्पलाइन क्रमांक प्रवाशांपासून ‘नॉट रिचेबल’होता. त्यानंतर आता तो सुरूझाला आहे.काही तांत्रिक कारणांमुळे रेल्वे पोलिसांची हेल्पलाइन बंद होती. मात्र शनिवार दुपारपासून हेल्पलाइन पुन्हा कार्यान्वित झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.यासाठी होतो वापरलोकलमध्ये वस्तू विसरणे, वस्तू गहाळ होणे, आपत्कालीन प्रसंगी रेल्वे स्थानकात किंबहुना धावत्या लोकलमध्ये मदत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांची १५१२ ही हेल्पलाइन फायदेशीर ठरत आहे. या हेल्पलाइनवरून स्थानकांतील किंबहुना लोकलमधील ‘आॅन ड्युटी’ रेल्वे पोलिसांशी थेट संपर्क साधता येत असल्याने प्रवाशांना तातडीने मदत मिळते. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांसाठीही तीउपयुक्त आहे.

टॅग्स :पोलिस