गोरेगाव येथील म्हाडाच्या भूखंडावर अतिक्रमण

By Admin | Updated: December 7, 2015 01:33 IST2015-12-07T01:33:18+5:302015-12-07T01:33:18+5:30

गोरेगाव (पश्चिम) येथील लिंक रोडवरील भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असतानाही त्याकडे म्हाडा अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे

Encroachment on MHADA plot in Goregaon | गोरेगाव येथील म्हाडाच्या भूखंडावर अतिक्रमण

गोरेगाव येथील म्हाडाच्या भूखंडावर अतिक्रमण

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील लिंक रोडवरील भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असतानाही त्याकडे म्हाडा अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. भूमाफियांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे सरकारचे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप जन मुक्ती मोर्चा या सामाजिक संस्थेने केला आहे.
लिंक रोडवरील हायपर सिटी मॉलसमोरील या जागेत भूमाफिया मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून झोपड्या बांधत आहेत. याबाबत जन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मानव जोशी यांनी म्हाडा, उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारअर्ज दाखल केले आहेत. वास्तविक, सरकारी धोरणानुसार म्हाडाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच मध्यमवर्गीय गरजूंसाठी घरे उभारणे आवश्यक आहे. मात्र भूमाफियांकडून होणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे म्हाडा या भूखंडांवर घरे उभारू शकत नसल्याने गरजूंचे नुकसान होत असल्याचे मानव जोशी यांनी सांगितले.
अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने ज्याप्रमाणे प्रतीक्षानगर येथे सरकारी अधिकाऱ्यांसाठी घरे बांधण्यात आली तशीच या जागेवरही घरे उभारून ती पोलीस, महापालिका तसेच अन्य सरकारी अधिकाऱ्यांना द्यावीत, अशी मागणीही जोशी यांनी केली आहे.

Web Title: Encroachment on MHADA plot in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.