सोरेस मार्गावर झोपड्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:28+5:302021-06-20T04:06:28+5:30

मुंबई : चेंबूर येथील सिंधी कॅम्प व सायन-पनवेल मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून ...

Encroachment of huts on Soares Road | सोरेस मार्गावर झोपड्यांचे अतिक्रमण

सोरेस मार्गावर झोपड्यांचे अतिक्रमण

मुंबई : चेंबूर येथील सिंधी कॅम्प व सायन-पनवेल मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून येथे अनधिकृत या झोपड्या बांधून बेघर नागरिक राहत आहेत. याचा त्रास पादचारी, तसेच वाहन चालकांना होत आहे. थेट रहदारीच्या रस्त्यावरच झोपड्या बांधल्याने नेमकी वाहने चालवावी कुठून, असा प्रश्न येथे वाहन चालकांना पडत आहे.

या झोपड्यांमुळे परिसर अतिशय विद्रुप दिसत असून, येथे अस्वच्छताही पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. या झोपड्यांमधून अनेकदा लहान मुले खेळत रस्त्यावर येत असल्याने, येथे अपघात घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या झोपड्या हटविल्या जात नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर या झोपड्यांमधील नागरिकांना स्थलांतरित करून हा मार्ग रहदारीसाठी मोकळा करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Encroachment of huts on Soares Road