अतिक्रमणे जमीनदोस्त
By Admin | Updated: April 6, 2015 23:00 IST2015-04-06T23:00:03+5:302015-04-06T23:00:03+5:30
शासनाच्या आदेशानुसार वसईच्या महसूल विभागाने नव्या शर्तीच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरूवात केली आहे.

अतिक्रमणे जमीनदोस्त
वसई : शासनाच्या आदेशानुसार वसईच्या महसूल विभागाने नव्या शर्तीच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी दिवसभरात कोल्ही-चिंचोटी परिसरात ४० ते ५० बांधकामे हटवण्यात आली. ही मोहिम दीड महिना राबवण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुनिल कोळी यांनी लोकमतला सांगितले.
मुंबई महामार्गालगत अनेक शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नव्या शर्तीखाली विविध कामासाठी घेतलेल्या जमिनीवरही बांधकामे झाल्यामुळे ही बांधकामे उद्ध्वस्त करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. त्यानुसार आजपासून वसईचे तहसिलदार सुनिल कोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज कोल्ही-चिंचोटी भागात धडक मोहिम राबवली. या मोहिमेदरम्यान ४० ते ५० बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. पोलीस संरक्षण व महानगरपालिकेची यंत्रणा उपलब्ध झाल्यास ही मोहिम अधिक प्रभावीरित्या राबवणार असल्याचे तहसिलदार सुनिल कोळी यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)