‘आदित्य बंगला रिकामा करा’

By Admin | Updated: November 8, 2015 00:03 IST2015-11-08T00:03:00+5:302015-11-08T00:03:00+5:30

सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता आदित्य पांचोलीची मुंबईच्या जुहू भागातील बंगल्यावर भाडेकरू म्हणून अधिकार कायम ठेवण्याची विनंती शुक्रवारी फेटाळली.

'Empty Aditya Banga' | ‘आदित्य बंगला रिकामा करा’

‘आदित्य बंगला रिकामा करा’

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता आदित्य पांचोलीची मुंबईच्या जुहू भागातील बंगल्यावर भाडेकरू म्हणून अधिकार कायम ठेवण्याची विनंती शुक्रवारी फेटाळली.
न्यायमूर्तीद्वय जे.एस.खेहड व आर.भानुमती यांच्या पीठाने पांचोलीला ३१ डिसेंबरपर्यत हा बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. तुम्ही एक मोठे असामी आहात आणि फ्लॅट खरेदी करू शकता. तेव्हा तुमच्याकडून अशा प्रकारची वर्तणूक स्वीकारार्ह नाही,अशा शब्दात पीठाने त्यांना फटकारले. मुंबई उच्च न्यायालयाकडून दाद न मिळाल्याने पांचोली यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या परिसरातील बाजारभावानुसार आपण भाडे देण्यास तयार आहोत,असे पांचोली यांनी २ नोव्हेंबरला सांगितले होते. (वृत्तसंस्था)ं

Web Title: 'Empty Aditya Banga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.