बांधकाम साइटवर कामगाराची आत्महत्या, गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 02:19 IST2017-09-22T02:19:31+5:302017-09-22T02:19:35+5:30

जे.जे. मार्ग परिसरात बांधकाम साइटवर एका कर्मचा-याने गळफास घेत आत्महत्या केली. बुद्ध देव सुबल बागडी (२७) असे मृत कामगाराचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागचे गूढ कायम आहे.

Employer suicides on construction site, remain intact | बांधकाम साइटवर कामगाराची आत्महत्या, गूढ कायम

बांधकाम साइटवर कामगाराची आत्महत्या, गूढ कायम

मुंबई : जे.जे. मार्ग परिसरात बांधकाम साइटवर एका कर्मचा-याने गळफास घेत आत्महत्या केली. बुद्ध देव सुबल बागडी (२७) असे मृत कामगाराचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागचे गूढ कायम आहे. याबाबत जे.जे. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जे.जे. मार्ग येथील इमाम रोड परिसरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जे. जे. मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. तेव्हा बागडी हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने बांधकाम साइटवरील इलेक्ट्रिक रूममध्येच गळफास घेतला होता. त्याच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून कुठल्याही स्वरूपाची सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागचे गूढ कायम आहे. बागडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत जे.जे. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत तेथील अन्य कामगार, मित्र, नातेवाईक यांच्याकडेही पोलीस चौकशी करत आहेत. तसेच परिसरातील दुकानदार, रहिवाशांकडूनही माहिती गोळा करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्हीही तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Employer suicides on construction site, remain intact