कामगारांची सुरक्षा ऐरणीवर
By Admin | Updated: August 25, 2014 00:41 IST2014-08-25T00:41:25+5:302014-08-25T00:41:25+5:30
एम्बायो कारखान्यात आज घडलेल्या दुर्घटनेनंतर महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला

कामगारांची सुरक्षा ऐरणीवर
महाड : एम्बायो कारखान्यात आज घडलेल्या दुर्घटनेनंतर महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या औद्योगिक वसाहतीमधील बहुतांशी अपघात हे कामगारांच्या चुकांमुळे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्यानेच घडतात, यावरून स्पष्ट दिसून येत आहे.
एम्बायो कारखान्यात आज पहाटे रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने गणेश कांबळे या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. चार कामगार जखमी झाले. या दुर्घटनेमागील कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी मानवी चुकांमुळेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा औद्योगिक परिसरात आज केली जात आहे. महाड औद्योगिक वसाहतीत ९५ टक्के कारखाने हे रासायनिक प्रक्रियेवर आधारित असल्याने येथील कारखान्यामध्ये नियमितपणे किरकोळ अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र अशा अपघातात एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्या घटनेची तीव्रता आणखी जाणवते. या कारखान्यामध्ये नियमितपणे होणाऱ्या दुर्घटना ही एक गंभीर आणि चिंतेची बाब आहे.