मुरुड ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी पगाराविना
By Admin | Updated: December 23, 2014 22:30 IST2014-12-23T22:30:09+5:302014-12-23T22:30:09+5:30
२०१२ पूर्वी मुरुड ग्रामीण रुग्णालयाची पार वाताहत झालेली होती. २०१२ नंतर ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट होवू लागला.

मुरुड ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी पगाराविना
आगरदांडा : मुरुड-जंजिरा येथील ग्रामीण रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांचा गेल्या सहा महिन्यांपासून पगार झाला नसल्याने कर्मचारी आर्थिक व्यवहार सांभाळताना मुरूड - जंजिरा येथील ग्रामीण रुग्णालयात काम करणारे सुनील वाळंज (पहारेकरी), दिनेश घराणे (शिपाई), विलासणी चिटणीस (कक्षसेविका), नीलेश भायदे (चालक) हे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत.
२०१२ पूर्वी मुरुड ग्रामीण रुग्णालयाची पार वाताहत झालेली होती. २०१२ नंतर ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट होवू लागला. ग्रामीण रुग्णालयात शहरातून, तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येवू लागले. या रुग्णालयात काम करणारे कर्मचारी तसे कमीच आहेत, तरी या चार कर्मचाऱ्यांचा पगार सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य मिशन या संस्थेने थकवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली
आहे.
यामधील एक कर्मचारी चालक नीलेश भायदे सार्वजनिक आरोग्य विभागातून सेवा देत आहे, तर अन्य तीन सुनील वाळंज, दिनेश घराणे, विलासिनी चिटणीस हे कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून सेवा देतात. तरी यांना लवकरात लवकर पगार मिळावा, अशी मागणी इतर कर्मचारीवर्ग करीत आहे. (वार्ताहर)