अश्लील चाळे करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक
By Admin | Updated: May 26, 2017 00:42 IST2017-05-26T00:42:02+5:302017-05-26T00:42:02+5:30
शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रकार गोरेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी घडला होता

अश्लील चाळे करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रकार गोरेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाच्या मुसक्या गुरुवारी आवळल्या आहेत. तो मालाडच्या एमएम मिठाईवाल्याकडे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरेगाव पश्चिम परिसरात १० वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत राहते. २३ मे २०१७ रोजी रात्री तिचे पालक काही कामाने बाहेर गेले होते. तेव्हा साडेआठच्या सुमारास ती मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून रवी (नावात बदल) हा तिच्या शेजारी राहणारा तरुण तिच्या घरी गेला. जिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तिथून पसार झाला. पालक घरी आल्यावर तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्यानुसार त्यांनी या प्रकरणी गोरेगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गोरेगाव पोलिसांनी चौकशी करत रवीला मालाड स्टेशनजवळ असलेल्या एमएम मिठाईवाला या दुकानातून अटक केली. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.