वैधमापन कार्यालयात कर्मचा-यांची टंचाई

By Admin | Updated: December 25, 2014 23:10 IST2014-12-25T23:10:38+5:302014-12-25T23:10:38+5:30

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरासह ग्रामिण परिसरातील हजारो वजनकाट्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी फक्त तीन कर्मचाऱ्यांवर आहे़

Employee scarcity in the validation office | वैधमापन कार्यालयात कर्मचा-यांची टंचाई

वैधमापन कार्यालयात कर्मचा-यांची टंचाई

उल्हासनगर : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरासह ग्रामिण परिसरातील हजारो वजनकाट्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी फक्त तीन कर्मचाऱ्यांवर आहे़ कर्मचाऱ्याअभावी वजनमापे कार्यालय बहुतांश वेळा बंद ठेवावे लागत आहे. यामुळे नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकत नसल्याची प्रतिक्रीया वैधमापन अधिकाऱ्यांनी दिली़
शहरातील कॅम्प नं-५, परिसरातील एका बॅरेक मध्ये वजनमापे कार्यालय थाटले असून तेथे निरिक्षक वैधमापन अधिकारी, क्षेत्र सहाय्यक व शिपाई असे ३ पदे मंजूर आहेत. यापैकी कोणताही कर्मचारी सुटीवर अथवा बैठकीला ठाणे कार्यालयात गेला तर कार्यालय बंद ठेवण्याची वेळ कार्यालय प्रमुखावर येत आहे. १६ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येला ३ कर्मचारी न्याय देतील का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर शहर झपाट्याने वाढत असून तीनही शहरांसह ग्रामीण परिसरातील लोकसंख्या १६ लाखा पेक्षा जास्त असून ८ हजारापेक्षा जास्त संगणकीय व मॅकेनिकल काटे आहेत. ही वजनमापे प्रमाणित ठेवण्याची जबाबदारी वजनमापे कार्यालयाची आहे. वजनमापे कार्यालयाने हे काटे प्रमाणित व दुरूस्ती करण्यासाठी ३६ खाजगी संस्थांना परवाने दिले आहेत़

Web Title: Employee scarcity in the validation office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.