कर्मचा:यांच्या सफाई मोहिमेवर आयुक्तांचा वॉच
By Admin | Updated: October 17, 2014 01:39 IST2014-10-17T01:39:36+5:302014-10-17T01:39:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिलेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला पुढे नेण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच वर्षाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आह़े

कर्मचा:यांच्या सफाई मोहिमेवर आयुक्तांचा वॉच
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिलेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला पुढे नेण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच वर्षाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आह़े या मोहिमेच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्यासाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्वत: पालिका शाळा, रुग्णालये, मंडया, प्रशासकीय कार्यालये आणि सार्वजनिक
ठिकाणी धाड टाकण्यास सुरुवात केली आह़े
केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त आयुक्त विकास खारगे यांनी सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त व संबंधित खातेप्रमुखांची नुकतीच बैठक बोलावली होती़ पालिका कर्मचा:यांनाही स्वच्छतेची शपथ दिल्याने पालिका मुख्यालयापासून विविध कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू झाली आह़े या मोहिमेचा आढावा या बैठकीतून घेण्यात आला़ त्यानुसार पालिका कार्यालयांमध्ये शुक्रवारी सायंकाळी 5़3क् ते 7़ 3क् अशी दोन तास सफाई मोहीम घेतली जात आह़े (प्रतिनिधी)
नागरिकांचा सहभाग घेणार
सार्वजनिक परिसराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आह़े त्यामुळे दर शनिवारी प्रत्येक विभागात प्रभागनिहाय नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आह़े