सायन रुग्णालयात कर्मचारी वसाहतीतील स्लॅब कोसळला
By Admin | Updated: December 11, 2014 01:04 IST2014-12-11T01:04:35+5:302014-12-11T01:04:35+5:30
सायन रुग्णालयात काम करणा:या कर्मचा:यांसाठी जीटीबी स्थानकाजवळ असलेल्या कर्मचारी वसाहतीतील स्लॅब कोसळून 1क् वर्षाची मुलगी जखमी झाली आहे.

सायन रुग्णालयात कर्मचारी वसाहतीतील स्लॅब कोसळला
मुंबई : सायन रुग्णालयात काम करणा:या कर्मचा:यांसाठी जीटीबी स्थानकाजवळ असलेल्या कर्मचारी वसाहतीतील स्लॅब कोसळून 1क् वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. 1क् इमारतींच्या वसाहतीमध्ये 8 इमारतींच्या दुरुस्तीचे काम गणपतीच्या आधीपासून सुरू करण्यात आले आहे. या इमारतींपैकी एका इमारतीच्या तिस:या मजल्यावर गॅलरीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून पहिल्या मजल्यावरील 1क् वर्षाच्या नंदिनी जगताप नामक मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. सध्या नंदिनीची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या इमारतीच्या गॅलरीचे काम सुरू करण्यात आले आहे. या इमारतीचा काही भाग फोडण्यासाठी ड्रिलिंग मशिनचा वापर केला जात होता. येथील रहिवाशांनी ड्रिलिंग मशिन वापरल्यामुळे इमारतीला धक्के बसत आहेत, यामुळे मशिन वापरू नये, असे सांगितले होते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास तिस:या मजल्यावरच्या गॅलरीमध्ये काम सुरू होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने पहिल्या मजल्यावरील रहिवासी बाहेर आले. या वेळी नंदिनीदेखील बाहेर गॅलरीत आली. या वेळी तिच्या डोक्यावर स्लॅब कोसळून तिच्या डोक्याला जखम झाली, असे वैशाली शिंदे यांनी सांगितले. नंदिनी ही वैशाली यांची भाची आहे. दोन दिवसांपूर्वी नंदिनी वैशाली यांच्याकडे राहण्यास आली होती. (प्रतिनिधी)
गेल्या काही महिन्यांपासून इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे गॅलरी तोडून तिथे पत्रे लावण्यात आले आहेत. वरच्या मजल्यांवर आणि गच्चीत काम सुरू असल्यामुळे आम्हाला दिवसभर दार बंद करूनच बसावे लागते. बाहेर यायचे असल्यास कामगारांना हाका मारून सांगावे लागते. इमारतीतल्या अनेक मुलांना बिल्डिंगमध्ये कित्येक दिवसांपासून लावून ठेवलेले पत्रे लागल्याचेही प्रकार घडले असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणो आहे.