भावनिकतेमुळे नेत्रदानाचा टक्का घसरला !

By Admin | Updated: June 9, 2014 23:07 IST2014-06-09T23:07:03+5:302014-06-09T23:07:03+5:30

जनतेमध्ये नेत्रदानाविषयी असलेल्या भावनिक प्रश्नांमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी झाले आहे.

Emotional aspect reduced eyeball! | भावनिकतेमुळे नेत्रदानाचा टक्का घसरला !

भावनिकतेमुळे नेत्रदानाचा टक्का घसरला !

>ठाणो : जनतेमध्ये नेत्रदानाविषयी असलेल्या भावनिक प्रश्नांमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यंदाच्या वर्षी एपिल 2क्13 ते मार्च 2क्14 या कालावधीत 338 ठाणोकरांनी नेत्रदान केले असून 194 जणांना दृष्टी मिळाली आहे. त्यातच मागील वर्षाच्या (2क्12-13) तुलनेत नेत्रदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.  मागील वर्षी 36क्  जणांनी नेत्रदान केले असून 79 जणांना दृष्टी मिळाली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 115 जणांना दृष्टी मिळाली आहे. 
ठाणो जिल्ह्यात सहियारा ही एकमेव आय बँक असून ठाणो जिल्हा सरकारी रु ग्णालयासह आठ नेत्रपेढय़ा कार्यरत आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील मृत रुग्णांच्या नातेवाइकांना नेत्रदानाचा निर्णय घ्यावा यासाठी नेत्रदान समुपदेशक म्हणून महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुतेक वेळा मृतांचे नातेवाईक दु:खाच्या छायेत असल्यामुळे नेत्नदानाचा निर्णय घेण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे नेत्नतज्ज्ञ डॉ.  प्रसन्न देशमुख यांनी सांगितले. तसेच सुशिक्षित वर्गात नेत्रदानाविषयी जनजागृती मोठय़ा प्रमाणावर होत आहे. परंतु अशिक्षित वर्गास नेत्रदानाविषयी निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणो कठीण जात आहे. 
यंदाच्या वर्षी प्रथमच जागतिक नेत्रदानाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 2 लाख 18 हजार 817 शालेय विद्याथ्र्याची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये 13 हजार 84क् विद्याथ्र्यामध्ये नेत्रदोष आढळल्याने त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. 
ठाणो जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानामुळे ते उपचारासाठी तयार होत नाहीत. तसेच नेत्रदान केलेले सर्वच डोळे हे उत्तम असतात असे नाही. त्यातील काही चांगल्या डोळ्यांचे रोपण केले जाते तर काही रिसर्च परपझसाठी वापरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 
नेत्रदान करताना कोणती काळजी घ्यावी ..
च्नेत्रदानासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करावा. 
च्मृत व्यक्तीचे डोळे नीट बंद करावेत. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवून डोके शरीरापेक्षा सहा इंच वर ठेवावे. 
च्डोळ्यावर थंड पाण्याच्या घडय़ा ठेवून त्या सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
च्डोळ्याचे पारदर्शक पटल सुकू नये म्हणून पंखे बंद ठेवावेत.

Web Title: Emotional aspect reduced eyeball!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.