Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघे जग अवाक्...! मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॉगिंग करताना दिसले... (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:33 IST

Macron jogging Marine Drive :

मुंबई : राजशिष्टाचार आणि कडेकोट सुरक्षा बाजूला सारून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबईच्या 'मरिन ड्राईव्ह'वर जॉगिंग करताना दिसले. भारताच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले मॅक्रॉन सध्या मुंबईत असून, आज सकाळी त्यांनी चक्क सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे मरिन ड्राईव्हच्या किनारपट्टीवर धावण्याचा आनंद घेतला.

सुरुवातीला मरिन ड्राईव्हवर फिरणाऱ्या नागरिकांना आपल्या शेजारून धावणारी व्यक्ती फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे लक्षातच आले नाही. मात्र, काही वेळाने त्यांची ओळख पटताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. जगातील एका शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही बडेजावाशिवाय, कोणतीही असुरक्षा, धोका मनात न बाळगता  मुंबईच्या रस्त्यावर जॉगिंग करत असल्याचे पाहून अनेकजण अवाक झाले.

मुंबईकरांनी कॅमेऱ्यात कैद केला क्षणमॅक्रॉन यांची ओळख पटल्यानंतर मॉर्निंग वॉकला आलेल्या मुंबईकरांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवर त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले, तर काहींनी त्यांना अभिवादनही केले. मॅक्रॉन यांनीही मुंबईकरांच्या या उत्साहाला हसतमुखाने प्रतिसाद दिला. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षकही साध्या वेशात धावत होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या मुंबई भेटीतील 'जॉगिंग'ची चर्चा आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Macron Stuns Mumbai: French President Spotted Jogging on Marine Drive

Web Summary : French President Macron, on an official visit to India, surprised Mumbaikars by jogging on Marine Drive. Locals were amazed to see him without heavy security, casually exercising. Many captured the moment on their phones, creating a social media buzz.
टॅग्स :फ्रान्सराफेल डील