एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

By Admin | Updated: August 10, 2015 01:38 IST2015-08-10T01:38:46+5:302015-08-10T01:38:46+5:30

एमिरेट्स एअरलाइन्सच्या इके ४४० या विमानाचे रविवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले

Emirates Airlines's Emergency Landing | एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई : एमिरेट्स एअरलाइन्सच्या इके ४४० या विमानाचे रविवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान प्रवासादरम्यान एका आॅस्ट्रेलियन प्रवाशाचा मृत्यू ओढावल्याने हे
लँडिंग करण्यात आल्याचे
एमिरेट्स एअरलाइन्स प्रशासनाने स्पष्ट केले.
आॅस्ट्रेलियाला जाणाऱ्या या विमानात आॅस्ट्रेलियन प्रवाशाची तब्येत अचानक बिघडून काही क्षणांत त्याचा मृत्यू झाला. प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, तो प्रवासी कर्करोग रुग्ण असावा, अशी प्राथमिक माहिती सहार पोलिसांनी दिली. प्रवाशाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात सुरू आहे. हा अहवाल अद्याप आलेला नाही, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रवाशाकडे कॅन्सरशी संबंधित औषधे आढळून आली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Emirates Airlines's Emergency Landing