मुंबई : मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखुबाई आणि मुलाला पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौ-यावेळी डांबून ठेवले, ही अघोषीत आणीबाणी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे.हा अत्यंत असंवेदनशील प्रकार आहे. लोकशाहीची मूल्ये पायी तुडवून अघोषित आणीबाणी पुकारणाºया सरकारने हे वेळीच थांबवावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल, असे टिष्ट्वट पवार यांनी केले आहे.
पाटील कुटुंबीयांना डांबणे ही आणीबाणी -शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:32 IST