आपत्कालीनचे पोलखोल
By Admin | Updated: July 28, 2014 00:28 IST2014-07-28T00:28:22+5:302014-07-28T00:28:22+5:30
महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा अत्यंत तकलादू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नियंत्रण कक्षातील कर्मचारी मदतीऐवजी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.

आपत्कालीनचे पोलखोल
नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा अत्यंत तकलादू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नियंत्रण कक्षातील कर्मचारी मदतीऐवजी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. काही केंद्रांत कर्मचारी चक्क झोपा काढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आरखडा कागदावर आदर्श असला तरी प्रत्यक्षात मात्र ही यंत्रणा अत्यंत तकलादू आहे. लोकमतने याविषयी वारंवार आवाज उठविला आहे. पालिकेने मुख्यालय, परिमंडळनिहाय नियंत्रण कक्ष व विभाग कार्यालयात स्वतंत्र केंद्र तयार केले आहे. या ठिकाणी २४ तास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणत्याही आपत्तीमध्ये तत्काळ मदत करण्यासाठी बनविलेल्या या केंद्राचा कारभार कसा चालतो यासाठी लोकमतने २६जुलैला मध्यरात्री सर्व केंद्रांच्या कामाची पद्धत तपासण्याचा प्रयत्न केला. यामध्ये धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. ११ पैकी २ ठिकाणी फोनच उचलण्यात आला नाही. उर्वरित ९ ठिकाणी फोन उचलला गेला परंतु कोठूनच अपेक्षित मदत मिळाली नाही.