आपत्कालीन व्यवस्थापन बळकट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:59+5:302021-02-05T04:33:59+5:30
मुंबई : आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत महापालिकेच्या १३ रुग्णालयांमध्ये रुग्णालय नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या ...

आपत्कालीन व्यवस्थापन बळकट होणार
मुंबई : आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत महापालिकेच्या १३ रुग्णालयांमध्ये रुग्णालय नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या आपतग्रस्तांची माहिती मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करणे, रुग्णालयात निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबतच्या बाबींवर नियंत्रण ठेवणे, संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती देणे, सीसीटीव्हीचा वापर करून निरीक्षण करणे, याकरिता रुग्णालय नियंत्रण कक्ष हे आपत्कालीन परिस्थितीत संपर्काचे एकच केंद्र म्हणून कार्यरत असणार आहे.
अग्नी आणि औद्योगिक सुरक्षा व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिता सुरू करण्यात आला आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जलद आणि गुणवत्तापूर्ण प्रतिसाद देण्यास मदत होणार आहे. याव्यतिरिक्त संभाव्य धोके लक्षात घेता विश्लेषण अहवाल तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संभाव्य धोक्यांची वारंवारतेचा अभ्यास करण्यात येणार आहे. मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी मदत होईल. यासाठी एकूण १८.२६ कोटींची तरतूद आहे.