नागपूर ते हैदराबाद विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:07 IST2021-05-07T04:07:02+5:302021-05-07T04:07:02+5:30
मुंबई : नागपूरहून हैदराबाद येथे जाणाऱ्या एका नॉन शेड्यूल विमानात गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. परिणामी तत्काळ हे विमान ...

नागपूर ते हैदराबाद विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
मुंबई : नागपूरहून हैदराबाद येथे जाणाऱ्या एका नॉन शेड्यूल विमानात गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. परिणामी तत्काळ हे विमान मुंबईच्या दिशेने वळविण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अगदी सुखरुप उतरविण्यात आले.
विझक्रॉफ्ट कंपनीचे विमान होते. वैमानिक केसरी सिंग हे या विमानाचे पायलट होते. तासाभरापूर्वी अलर्ट आला होता. अशावेळी विमानाचे वजन कमी होणे गरजेचे होते. परिणामी तासभर हे विमान आकाशात उडविण्यात आले. त्यानंतर हे विमान विमानतळावर उतरविण्यात आले. हे सगळे सुरू असतानाच मुंबई विमानतळावर अलर्ट देण्यात आला होता. जास्त मोठी धावपट्टी मिळावी यासाठी मुंबई विमानतळाची निवड करण्यात आली.
सुदैवाने हे सगळे करताना स्फोट झालेला नाही. आग लागलेली नाही. अनेक वेळा जास्त इंधन असेल तर विमानाला धक्का बसतो. अशावेळी चांगले वैमानिक इंधन संपविण्याचा निर्णय घेतात. इंधन संपविले जाते. मग विमान खाली उतरविले जाते. या प्रकरणात हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विमान सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले मंदार भारदे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले.