Join us

Video : नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:08 IST

नागपूर विमानतळाहून विमानाचे टेक ऑफ होताच, त्याचे एक चाक गळून पडले, त्यामुळे त्याचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. सुदैवाने विमानाचे लँडींग सुरक्षितपणे झाले.

मुंबई - नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एअर अॅम्बुलन्सला अचानक बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. रुग्णांच्या सेवेसाठी या एअर अॅम्बुलन्सचा वापर केला जातो. नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या या एअर अॅम्बुलन्सचे टेक ऑफ होताच एक चाक गळून पडले, त्यामुळे मुंबई विमानतळावर ते लँडींग करण्यात आले. 

नागपूर विमानतळाहून विमानाचे टेक ऑफ होताच, त्याचे एक चाक गळून पडले, त्यामुळे त्याचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. सुदैवाने विमानाचे लँडींग सुरक्षितपणे झाले. जेट एअरवेजच्या C-90 VT-JIL या विमानाच्या बाबतीत ही घटना घडली. सुदैवाने विमानातील एक रुग्ण, एक नातवाईक आणि एका डॉक्टरलाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. 

अग्निशमन आणि बचाव प्रतिसादक, फलो वाहने, सीआयएसएफ, वैद्यकीय पथक यांच्यासह विमानतळांच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकास प्रवाशांच्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्वरित मदत करण्यात आली. खबरदारी म्हणून, आग लागू नये म्हणून फोम करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील विमाने  वेळापत्रकांवर आहेत.

टॅग्स :मुंबईहवाईदलनागपूर