पोरांची ‘एलिझाबेथ’ सुस्साट..
By Admin | Updated: November 14, 2014 01:21 IST2014-11-14T01:21:52+5:302014-11-14T01:21:52+5:30
लहान मुलाचं भावविश्व उलगडणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ आज बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

पोरांची ‘एलिझाबेथ’ सुस्साट..
बालदिनाचे ‘लोकमत’ कार्यालयात भन्नाट सेलीब्रेशन
लहान मुलाचं भावविश्व उलगडणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ आज बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच ‘बालदिना’चे निमित्त साधून चित्रपटातील श्रीरंग महाजन, पुष्कर लोणारकर आणि सायली भंडारकर-कवठेकर या ‘छोटय़ा’ कलाकारांनी ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयाला भेट देत धम्माल, मजा, मस्ती आणि दंगा करत बालदिन साजरा केला. त्यांच्या निवडीतील गमती, शूटिंगची मस्ती आणि एकूणच चित्रपटाचा प्रवास उलगडत या मुलांनी आपल्या उपस्थितीने सगळ्यांची अक्षरश: बोलतीच बंद केली. वय वर्षे बारा, सळसळता उत्साह, प्रचंड कुतूहल अशा गुणांमुळे या तिघांनी कार्यालयातील कामाची माहिती घेत अवघ्या काही वेळातच प्रत्येकाच्याच मनात खास जागा निर्माण केली.
सायली लोकमतची फॅन
लोकमत माझा आवडीचा पेपर आहे आणि मी सोलापूरला तो नियमित वाचते. ‘संस्कारांचे मोती’तली तुम्ही दिलेली सगळी कुपन्स मी वहीत लावली आहेत, असे तिने कार्यालयात आल्या आल्याच सांगितले. राशिभविष्यही खूप आवडते. सोलापूर आवृत्तीत प्रसिद्ध होणारी जुळ्यांची माहिती मला खूप आवडली. सुटी रे सुटी पान मस्त होते. ‘लोकमत’ची मी फॅन नंबर वन आहे, असे सांगत लगेच वही घेत दिवाळीची खास कविताही केली.
..नाहीतर डोक्यात हवा जाईल!
पंढरपूरच्या छोटय़ाशा गावातील रोजचं जगणं सोडून आता प्रमोशन आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या तिघांना आता ‘टीव्हीवर आल्यावर कसं वाटतंय..?’ याबद्दल विचारलं तर ‘फार काही वाटत नाही.. पण आवडतंय’ असं सायलीने सांगितलं. तर या प्रसिद्धीमुळे ‘खेळणं बंद झालंय का, तुम्हाला पाहायला गर्दी जमायला लागलीय का..?’ असं विचारताच ‘आम्हाला आता ओळखायला लागलेय, पण एवढंही नाही.. तेही बरंच आहे म्हणा, नाहीतर डोक्यात हवा जाईल’ असं म्हणत बारा वर्षाच्या पुष्करने ‘कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवरच हवेत हा विचार’ सहजगत्या उलगडला.
कार्यालयात आल्यानंतर समोर असलेला लोकमत पेपर चाळत कुठल्या पानावर काय बातम्या लागल्या आहेत याची तिघांची चाचपणी सुरू होती आणि मग संपादकीय विभागातल्या सहका:यांकडून ते जाणून घेण्यासाठी पळापळ सुरू झाली. उद्याचा पेपर नको दाखवूस हं, आताच सगळं फुटेल, असे सांगत श्रीरंगने सर्वाना गप्पच केले. मग आमच्या चित्रपटाची पानावर आलेली जाहिरात दाखव, असा आग्रह तिघांचा सुरू झाला. ती बघितल्यावर मी अशी काय दिसतेय वेगळीच, असे सायलीने म्हटले. त्यांच्या उत्सुकतापूर्ण प्रश्नांमुळे कार्यालयातील सहका:यांनाही किती बोलू किती नाही असे होऊन गेले.
मार कुणी खाल्ला?
चित्रपटादरम्यान परेशदादाला कुणी त्रस दिला, कुणी मार खाल्ला या प्रश्नावर या तिघांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. आम्ही कोणीही मार खाल्ला नाही, असे पुष्करने सांगताच, ए नाही, तुला मारलंय, चित्रपटात तुझा जो बाप दाखवलाय ना त्याने नाही का मारलं तुला, असे सांगत श्रीरंगने विकेटच घेतली. अजून कोणी कोणी किती त्रस दिला याचा 1क् मिनिटं खल करण्यात ही तिघं गुंतली होती. शेवटी परेश यांनी सगळ्यात जास्त मार मी खाल्ला म्हणत मुलांना त्यांच्या खलातून मोकळं केलं.
‘जय-वीरू’ची जोडी!
श्रीरंग आणि पुष्कर यांना त्यांच्या आवडीबद्दल विचारलं असता, दोघांनीही एकमेकांचं नाव घेत ‘आमच्यासारखे आम्ही’च असा दावा केला. त्यावर मग लगेच सायलीने हे दोघे म्हणजे ‘जय-वीरू’ जोडी आहे, असे म्हटले. त्यावर केवळ शूटिंगच्या दीड महिन्यात रुजलेलं मैत्रीचं नातं किती दृढ झालयं याची प्रचिती आली.
दगड.. दगडùù..चा बोलबाला!
गप्पांच्या ओघात पुष्करने गाणं गायला आवडतं आणि मी शिकलोयसुद्धा, असं सांगितलं. आणि मग काय काहीच वेळात ‘दगड दगडùù..’ हे गाणं गात तिघांनीही आपला दमदार परफॉर्मन्सही दिला. अख्ख्या कार्यालयात ‘एलिझाबेथ’ बघाच, असं सांगत ‘दगडùù.. दगड’ गात एकच कल्ला करीत उपस्थितांकडून मनमुराद दाद मिळवली.
तेव्हाचं तेव्हा बघू..
‘मोठं’ झाल्यावर काय होणार हे विचारताच, ‘अहो, पहिलं मोठं तर होऊ दे’ असा सूर श्रीरंग आणि पुष्करने आळवला. आताशी ‘मी सहावीत आहे.. पहिला हा अभ्यास तर होऊ दे ना.. दहावीत तर जाऊ दे.. मग मोठेपणीचा विचार करू आरामात’ असं बिनधास्त आणि बेधडक उत्तर देत पुष्करने बालपणीच लहानग्यांवर मोठेपण लादणा:या आणि स्पर्धेच्या युगात त्यांना ढकलणा:या पालकांना टोलाच लगावला. सायलीने मात्र मी मोठी झाल्यावर लेखिका आणि अभिनेत्री होणार, असं म्हणत ‘मधुगंधा’चा आदर्श ठेवल्याचे
सांगितले.
या चित्रपटाचे कथानक पंढरपूरमधील आहे. वारीच्या दिवसांमध्ये आपल्या आईला मदत करण्यासाठी एका लहान मुलाने आणि त्याच्या मित्रने केलेला उद्योग अशी चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘एलिझाबेथ’ आणि ‘एकादशी’ अशी दोन भिन्न भाषांतील नावे घेऊन येणारा हा चित्रपट मात्र पूर्णपणो मराठमोळ्या धाटणीचा आहे. चित्रपटाच्या जाहिरातीत दिसणारी हॅण्डलऐवजी स्टेअरिंग असलेली सायकल हीसुद्धा चित्रपटातील एका छुप्या वैज्ञानिकाची करामत आहे.
- परेश मोकाशी
चित्रपटाविषयी
बालदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट 186 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आठवडाभरात याचे तब्बल 27क्क् शो होणार आहेत, तर दिवसाला साधारण 4क्क् शो होतील. त्याचबरोबर गुजरात, बडोदा येथेही हा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे सीमावादाने धगधगणा:या बेळगावातही तो प्रदर्शित होणार आहे.
गोवा येथे होणा:या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान इंडियन पॅनोरमामध्ये या चित्रपटाला ओपनिंग फिल्मचा मान मिळाला आहे.
कलाकारांची निवड धोपट मार्गाने नाही - परेश मोकाशी
1अनेक चित्रपटांत लहान मुलांच्या तोंडी मोठय़ा माणसांचे विचार - वाक्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, या चित्रपटात आम्हाला लहानग्यांचे लहानपण, निरागसता, त्यांचे छोटेसे विश्व जपायचे होते. बालकलाकारांचा अभिनय अजिबात कृत्रिम न होता, अधिकाधिक वास्तववादी व्हावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले.
2त्यासाठीच चित्रपटाचे कथानक ज्या भागातील आहे, त्या पंढरपूरमधीलच मुलांची निवड अभिनयासाठी करण्यात आली. मुख्य म्हणजे ही निवड करताना ‘ऑडिशन’ वगैरे अशा धोपट मार्गाने न जाता, जरा वेगळी वाट चोखाळण्यात आली होती, असे ‘एलिझाबेथ’चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी सांगितले. कोणत्याही चित्रपटासाठी कलाकारांची निवड करताना सामान्यत: इच्छुकांना बोलावून त्यांचे ‘ऑडिशन’ घेतले जाते.
3त्यामध्ये जी चुणचुणीत-स्मार्ट मुलं असतात, त्यांचीच फक्त निवड होऊ शकते. परंतु, सकस अभिनय केवळ स्मार्ट मुलांकडेच असतो, असं नाही. त्यामुळे या चित्रपटाला आवश्यक असणारा साधा-सरळ आणि नैसर्गिक अभिनय करू शकणा:या मुलांना निवडायला मी स्वत:च पंढरपुरातील शाळेत गेलो होतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या. बोलता बोलता त्यांच्यातील गुण हेरले आणि मग त्यातून निवड केली, असेही मोकाशी पुढे म्हणाले.