सिटीझन्स फोरमचा कामोठ्यात नागरी सुविधांसाठी एल्गार

By Admin | Updated: March 30, 2015 00:23 IST2015-03-30T00:23:54+5:302015-03-30T00:23:54+5:30

शहरामध्ये नागरी सुविधा पुरविल्या जाव्यात व याठिकाणच्या रहिवाशांना माफक दरात सर्व वस्तू मिळाव्यात यासाठी सिटीझन्स फोरम कामोठेतर्फे शहरात रविवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली.

Eligar for the civil services in the work of the Citizens Forum | सिटीझन्स फोरमचा कामोठ्यात नागरी सुविधांसाठी एल्गार

सिटीझन्स फोरमचा कामोठ्यात नागरी सुविधांसाठी एल्गार

पनवेल : शहरामध्ये नागरी सुविधा पुरविल्या जाव्यात व याठिकाणच्या रहिवाशांना माफक दरात सर्व वस्तू मिळाव्यात यासाठी सिटीझन्स फोरम कामोठेतर्फे शहरात रविवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली.
शहरातील पदपथ फेरीवाल्यांपासून मुक्त करावेत, गावगुंडांना वेसण घालावे, महाग झालेल्या ब्रेड, अंडी, दूध, पाव आदी वस्तू माफक दरात मिळाव्यात, बससेवा सुरळीत करावी, मीटरप्रमाणे रिक्षा चालविणे, तसेच सिडकोमार्फत नागरी सेवांची योग्यपणे पूर्तता करावी या मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली. आम्हाला हक्काची बससेवा मिळाली पाहिजे, कोण म्हणतो मिळणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, दुबळी बससेवा मजबूत करा, असे घोषणाफलक झळकवण्यात आले. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. मानसरोवर रेल्वे स्थानकापासून सुरु झालेल्या पदयात्रेची सांगता कामोठे पोलीस ठाणे परिसरात सभेत झाली.
सिटीझन युनिट फोरम पनवेलने देखील या पदयात्रेला आपला पाठिंबा दिला. या पदयात्रेत एस. डी. कोटियन, सी. डी. शिंदे , गजानन शिंदे, अरु ण भिसे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Eligar for the civil services in the work of the Citizens Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.